डिसेंबरपर्यंत सर्व भारतीयांचे लसीकरण पूर्ण ः जावडेकर

0
125

देशातील लशींचे उत्पादन येत्या ऑगस्टपासून वाढणार असून डिसेंबरपर्यंत सर्व भारतीयांचे लसीकरण पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

यावेळी मंत्री जावेडकर यांनी स्वदेशी, परदेशी अशा सर्व लशींबाबत माहिती दिली. जावडेकर यांनी आपल्याकडची लसीकरणाविषयीची महत्त्वाची माहिती सादर केली. जावेडकर म्हणाले की, आतापर्यंत देशातील २० कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. डिसेंबरपर्यंत २१८ कोटी डोस उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे १०८ कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

कोविशिल्ड, कोवॅक्सिन, झायडस कॅडिला, नोवावॅक्स, जेनोवा, स्पुतनिक अशा देशात तयार होणार्‍या आणि परदेशातून मागवण्यात आलेल्या सर्व लशी उपलब्ध होणार आहेत. या सगळ्या लशींच्या डोसमुळे या वर्षीच्या डिसेंबरपर्यंतच सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणार आहे.

जावडेकर यांनी पुढे माहिती देताना सांगितले की, भारताने आत्तापर्यंत २० कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. जगभरात भारत लसीकरणाबाबत दुसर्‍या क्रमांकावर आहे.