कोव्हॅक्सिनला २-१८ वयाच्या मुलांवर चाचणीची परवानगी

0
129

काल गुरुवारी ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’कडून (डीसीजीआय) भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लशीची २ ते १८ या लहान मुलांच्या वयोगटावर चाचणीसाठी परवानगी दिली आहे. याअगोदर करोना लशीवर लक्ष ठेवणार्‍या तज्ज्ञांच्या समितीने या वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लशीच्या दुसर्‍या / तिसर्‍या टप्प्यातील चाचणीची शिफारस केली होती. आता भारत बायोटेककडून ५२५ सदस्यांची चाचणी केली जाणार आहे.