हवामान विभागाने अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे १५ मे ते १७ मे २०२१ दरम्यान राज्यात पावसाची शक्यता वर्तविली आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचे वादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यातील काही भागात जोरदार पाऊस व जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. समुद्र खवळलेला असणार असून मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे.