Home बातम्या म्युकरमायकोसिसचा साथरोग नियंत्रण कायद्यात समावेश

म्युकरमायकोसिसचा साथरोग नियंत्रण कायद्यात समावेश

0

भारतात आता कोरोनासोबतच म्युकरमायकोसिस या नव्या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या आजाराचा केंद्र सरकारने आता साथरोग नियंत्रण कायद्यामध्ये समावेश केला आहे. देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. तेलंगणा आणि राजस्थानने याआधीच म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराला महामारी घोषित केले आहे. आता केंद्र सरकारने देखील म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णांची दखल घेतली असून या आजाराचा समावेश साथरोग कायद्यामध्ये करण्यात आला आहे. बुधवारी केंद्र सरकारकडून त्यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली. आरोग्य विभागाचे साहाय्यक सचिव लव अगरवाल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.