कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष जूनमध्ये निवडणार

0
80

>> पक्षाच्या बैठकीत निर्णय

कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष जून महिन्यात निवडण्यात येणार असल्याचा निर्णय काल पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर अध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णय होईल. जून २०२१ मध्ये कॉंग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेगणुगोपाल यांनी दिली. राहुल गांधींच्या उपस्थितीत काल ही बैठक झाली. यावेळी पक्षाच्या दोन गटांत दोन मतांमुळे खडाजंगी झाली.
या बैठकीत वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मुकूल वासनिक आणि पी. चिदंबरम यांनी तात्काळ संस्थात्मक मतदान केले जावे अशी मागणी केली.तर अशोक गेहलोत, अमरिंदर सिंग, ए. के. अँटनी, तारिक अन्वर यांनी पाच राज्यांमधील निवडणुकांनंतर अध्यक्षपदाबाबत निर्णय घेतला जावा अशी भूमिका मांडली. यावरून दोन्ही गटांत बरीच खडाजंगी झाली.