लालूप्रसाद यांची प्रकृती खालावली

0
184

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती खालावली असून त्यांना सध्या रांचीमधील आरआयएमएम रुग्णालयात दाखल केले आहे. प्रकृती बिघडल्यानंतर गुरुवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या बर्‍याच काळापासून लालूप्रसाद यादव यांना अनेक व्याधींचा त्रास होत आहे. लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव आणि पत्नी राबडी देवी चार्टर्ड विमानाने पाटणा येथून रांचीला पोहोचले आहेत. लालूप्रसाद यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला आहे. आम्ही एम्स रुग्णालयाच्या संपर्कात आहोत. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.