कुचेलीत महिलेकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

0
135

>> म्हापसा पोलिसात गुन्हा नोंद

फोंडा येथील एका विवाहीत २९ वर्षीय आणि दोन मुले व चार महिन्यांचे एक अपत्य असलेल्या महिलेने एका साडे सतरा वर्षीय शाळकरी मुलाला कुचेली-म्हापसा येथे भाड्याची खोली घेऊन त्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार म्हापसा पोलिसात मुलाच्या आईकडून देण्यात आली आहे.
याबाबत म्हापसा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला व अल्पवयीन मुलगा फोंडा येथे राहणारे आहेत. या महिलेला दोन मुले असून आपल्या पतीला सोडून ती कुचेली-म्हापसा येथे गेल्या तीन महिन्यांपूर्वी भाड्याची खोली घेऊन राहत असे. त्या महिलेने अल्पवयीन मुलाला स्वतःवर लैंगिक संबंधांस जबरदस्तीने भाग पाडले. त्याला तो बळी पडला, अशी पोलिसांनी माहिती दिली. गेल्या तीन महिन्यांपासून अल्पवयीन मुलाने त्या महिलेशी लैंगिक संबंध ठेवले. यात तो शारीरिक व मानसिकदृष्ट्या खचला गेला. त्याला मनोरुग्णालयात दाखल केले असता सदर प्रकार उघडकीस आला. त्यावर त्या महिलेविरुद्ध म्हापसा पोलीस स्थानकात पीडित मुलाच्या आईने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुढील तपास म्हापसा पोलीस करीत आहेत.