तीन तासांच्या पावसाने नेत्रावतीला आला पूर

0
234

नेत्रावळीत न थांबता पडलेल्या तीन तासांच्या जोरदार पावसाने काल येथील नदीनाले तुडूंब भरून टाकले. महिनाभर पाऊस पडला तरीही या नदीला पूर येत नसे. मात्र तीन तासातच पावसाने आपला रुद्रावतार दाखवल्याने नेत्रावती नदीला पूर आला.
महालयात पडणारा पाऊस हा असाच असतो असे बुजुर्गांचे मत आहे. या काळात कधी नदी दुथडी भरून वाहू लागेल याचा नेम नसतो. म्हणून महालयात (म्हाळ) पडणार्‍या पावसाच्या पाण्याकडे दुर्लक्ष करून चालत नसते हे नेहमीच बुर्जुग सांगत होते. ते या पुरामुळे खरे ठरले आहे.
नेत्रावळीत पूर्वी नदीला पूर येताच लोकांच्या घरात पाणी यायचे. पण आता नद्यातील गाळ उपसल्याने पूराचा परिणाम तेवढा जाणवत नाही. परतीच्या पावसाने जोरदार वृष्टी केल्यामुळे त्याचा परिणाम भातपिकावर होण्याची भीती शेतकर्‍यांत पसरली आहे.