मध्यप्रदेश कॉंग्रेसला निवडणूक आयोगाने झटका देत माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा काढून घेतला आहे. कमलनाथ यांनी पुन्हा एकदा निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर आयोगाने ही कारवाई केली. यानंतर आयोगाने, यापुढे जर कमलनाथ यांनी एकही प्रचारसभा केली तर त्याचा संपूर्ण खर्च हा त्या मतदारसंघातील उमेदवाराकडून वसूल केला जाईल असा इशारा दिला आहे. आयोगाच्या या निर्णयाविरोधात कॉंग्रेस पक्ष आता न्यायालयात जाणार आहे. मध्य प्रदेश कॉंग्रेसचे माध्यम समन्वयक नरेंद्र सालुजा यांनी ही आयोगाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती दिली.