तुर्कस्थान, ग्रीसमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के

0
247

तुर्कस्थानमधील इजमिरमध्ये तसेच ग्रीस देशाच्याकाही भागात काल शुक्रवारी भूकंपाचा धक्का बसला. या धक्क्यामुळे तुर्कस्थानात २० इमारती कोसळल्या असून इमारतीच्या ढिगार्‍याखाली शेकडो लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७ इतकी नोंदवण्यात आली. भूकंपात चार जणांचा मृत्यू झाला असून १२० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून हा आकडा वाढण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भूकंपानंतर मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे.

या भूकंपाचे केंद्र ग्रीसमधील कार्लोवसियन शहराच्या उत्तर-पूर्व भागात १४ किमी दूर अंतरावर होते. जमिनीपासून कमी खोलवर भागात भूकंपाचे केंद्र असल्यामुळे तीव्र झटका लागला. यामुळेच अधिक इमारतींचे नुकसान झाले आहे. तुर्कस्थानचे राष्ट्रपती एर्दोगन यांनी भूकंप प्रभावित भागात मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले असून सर्व मदत केली जाणार असल्याचे सांगितले.

ग्रीसमध्ये ही गोंधळ
भूकंपाच्या क्कक्क्यानंतर ग्रीसमधील सामोसमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. काही घरांच्या आणि इमारतींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.