ऑक्टोबर महिन्यात पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ

0
89

देशी पर्यटकांच्या संख्येत १३ टक्के वाढ
यंदाच्या पर्यटन हंगामातील ऑक्टोबर महिन्यात पर्यटकांच्या संख्येत विक्रम झाला असून पर्यटन खात्याकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार यंदा या काळात ४ लाख ७६ हजार ८६१ पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. गेल्या २०१३ मध्ये ऑक्टोबर महिन्यात ४ लाख २० हजार १४२ पर्यटक गोव्यात आले होते. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५० हजार पर्यटक जादा आले.देशी पर्यटकांच्या संख्येतही बर्‍याच प्रमाणात म्हणजे १३.८ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. विदेशी पर्यटकांच्या संख्येत ११ टक्के वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यातील देशी पर्यटकांची संख्या ४ लाख ३२ हजार ९०५ तर विदेशी पर्यटकांची संख्या ४३ हजार ९५६ इतकी झाली. सेंट झेवियरच्या शवप्रदर्शनामुळे पर्यटकांची वाढ चालू राहील, अशी पर्यटन खात्याची अपेक्षा आहे.
राज्यात आयोजित करण्यात येणार्‍या वेगवेगळ्या उत्सवांमुळेच पर्यटक गोव्याकडे अधिक आकर्षित होत असल्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांचे म्हणणे आहे.