आमठाणे धरण पूर्ण भरले

0
115

>> अंजुणे धरणाने गाठली ८८ मीटरची पातळी

 

डिचोली तालुक्यात पावसाचा जोर चालूच असून काल रविवारी आमठाणे धरणाने आपली पूर्ण क्षमता पातळी गाठली. आता अतिरिक्तपाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. अंजुणे धरणाची पातळी ८८.०८ मीटरवर पोहचली असून ९३.२ मीटर ही या धरणाची पूर्ण क्षमता आहे. साधारणपणे ९१ ते९२ मीटरची पातळी गाठतानाच आवश्यक सूचना देऊन या धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील.
आमठाणे धरणाने आज ५० मीटरपूर्ण क्षमतेची पातळी गाठल्याची माहिती जलसंसाधन खात्याचे अभियंता के. पी. नाईक यांनी दिली. धरण परिसरात आतापर्यं ८८ इंच पावसाची नोंद झालेली असून पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. या धरणाला दरवाजे नसून पाणी भरताच अतिरिक्त पाणी आपोआप नानोडा नदीतून पार नदीत जाते. पाण्याचा प्रवाह वाढल्यास तशा सूचना अधिकृतपणे देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. अंजुणे धरणाने ८८.८ मीटर पातळी गाठलली असून याठिकाणी रविवारी ३८ मिलि पावसाची नोंद झाली. यंदा धरण पंधरादिवसानी भरण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने केवळ ९१ मीटरच धरणाने पातळी गाठली व २ मीटर पाणी कमी होते मात्र यंदा पावसाने ९२.६ इंच पतळी गाठली असून धरण भरणार आहे हे नक्की. डिचोली तालुक्यात पावसाने ९० गाठली असून पाऊस समाधानकारक पडत असून शेतीलाही पुरक आहे.