राज्यातील १३ पैकी ९ विभागांत पावसाने ओलांडले इंचांचे शतक

0
190

राज्यात तेरापैकी नऊ विभागांत मोसमी पावसाने इंचांची शंभरी पार केली आहे. पावसाने इंचाची शंभरी पार केलेल्या भागात पेडणे, फोंडा, पणजी, ओल्ड गोवा, साखळी, वाळपई, काणकोण, केपे आणि सांगे या भागांचा समावेश आहे.

राज्यात यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस पडला. राज्यातील पावसाने इंचाचे शतकसुद्धा गतवर्षीच्या तुलनेत लवकर पूर्ण केले. राज्यात आत्तापर्यंत १०५.५४ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील सरासरी पावसाचे प्रमाण २३ टक्के जास्त आहे. उत्तर गोव्यात २६ टक्के आणि दक्षिण गोव्यात २१ टक्के पावसाचे प्रमाण जास्त नोंद झाले आहे. राज्यातील विविध भागातील पावसाचे प्रमाण पेडणे – १२९.९० इंच, फोंडा – १०८.६३ इंच, पणजी – १०२.५५ इंच, ओल्ड गोवा – ११४.५१ इंच, साखळी – ११४.०३ इंच. वाळपई – १०१.४० इंच, काणकोण – ११४.७७ इंच, केपे – १०५.७७, सांगे – १००.८२ इंच असे आहे.

मुरगाव येथे ९६.१० इंच आणि मडगाव येथे ८७.९५ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर दाभोळी आणि म्हापसा येथील पावसाची आकडेवारी उपलब्ध झाली नाही.
दरम्यान, राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असून राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.