ठळक बातम्या

गोवा फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आपला निर्णय जाहीर करताना धेंपो उद्योगसमुहाचे चेअरमन श्रीनिवास व्ही. धेंपो. बाजूला जीएफएचे अध्यक्ष तथा नगरविकासमंत्री ज्योकिम आलेमाव आणि जीएफएचे माजी अध्यक्ष तथा साळगावकर स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष शिवानंद साळगावकर.

 

श्रीनिवास धेंपो जीएफए अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार

गोमंतकीय फुटबॉलला नवे वैभव आणि नवी उंची प्राप्त करून देण्यासाठी गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नेतृत्वाची धुरा हाती घ्यावी अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून हितचिंतक, धेंपो स्पोटर्‌‌स क्लबचे चाहते आणि फुटबॉलप्रेमींकडून सातत्याने होत आहे. त्यांच्या सूरात आता साळगावकर स्पोटर्‌‌स क्लबचे अध्यक्ष शिवानंद साळगावकर, चर्चिल ब्रदर्सचे प्रमुख चर्चिल आलेमाव आणि ज्योकिम आलेमाव यांनीही सूर मिसळला आहे. गोमंतकीय फुटबॉल अधिक प्रगत आणि बलशाली बनविण्यासाठी, जीएफएच्या भावी महत्वपूर्ण टप्प्यात माझ्या योगदानाची गरज आहे असे पटवून देत त्यांनी माझे मन वळविण्यात यश मिळविलेले असून, त्यामुळे अखेर मी जीएफए अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, अशी औपचारिक घोषणा धेंपो स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यानी काल पत्रकार परिषदेत केली.
Read more...
 

मराठी-कोकणी माध्यमातील प्राथमिक विद्यार्थ्यांमध्ये घट

शहरांपाठोपाठ आता ग्रामीण भागांतील पालकही आपल्या मुलांना प्राथमिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून देण्यावर भर देऊ लागल्याने राज्यातील मराठी आणि कोकणी माध्यमातून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचा आकडा झपाट्याने खाली येऊ लागला असल्याचे शिक्षण खात्यातील सूत्रांनी सांगितले. राज्यात ९२७ मराठी सरकारी प्राथमिक शाळा आहेत. या शाळांतून ३३, ५७८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र असे असले तरी मराठी व कोकणी या मातृभाषांतून प्राथमिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचा आकडा झपाट्याने खाली येऊ लागला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
Read more...
 

मतदार नावनोदणीतील घोळाबाबत मुख्य निवडणूक आयुक्तांस साकडे

गोव्यातील मतदार याद्यांत नव्या मतदारांची नावे घालताना भारतीय निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात न आल्याचा आरोप काल पिळर्ण नागरिक फोरमने येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला व अयोग्य पद्धतीचा अवलंब करून मतदार याद्यांत जी नावे घालण्यात आलेली आहेत ती काढून टाकावीत तसेच या याद्यांची नव्याने छाननी करावी, अशी मागणी दोन दिवसांपूर्वी आयुक्त एस. वाय. कुरेशी यांच्याकडे केल्याचे पिळर्ण नागरिक फोरमचे समन्वयक पॉल फर्नांडिस यांनी सांगितले. वरील मागणी मान्य न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेणार असल्याचे फर्नांडिस म्हणाले.
Read more...
 

जीसीए विरोधात आज सुनावणी

माहिती हक्क कायद्याखाली माहिती देण्यास नकार देणार्‍या गोवा क्रिकेट असोसिएशनविरोधात समाजकार्यकर्ते ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी केलेल्या तक्रारीवर गोवा राज्य माहिती आयोगासमोर ३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वा. सुनावणी होणार आहे. माहिती आयोगाने गोवा क्रिकेट असोसिएशनच्या सचिवांना नोटीस बजावून आयुक्तांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
Read more...
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 1 of 736
 
This is a test