Home Featured 5 पारंपरिक उत्पादनांना भौगोलिक मानांकन

5 पारंपरिक उत्पादनांना भौगोलिक मानांकन

0

गोव्यातील ताळगावची वांगी, गोवा हिलारियो आंबा, गोवा कोरगुट तांदूळ, गोवा काजू बोंडू (सफरचंद) आणि गोवा मुस्सरद आंबा यांना पाच पारंपरिक उत्पादनांना भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) प्राप्त झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.
राज्याच्या समृद्ध कृषी वारसा आणि पारंपरिक उत्पादनांचे संवर्धन केले जात असून, शेतकऱ्यांना सक्षम बनवून आणि ग्रामीण गोव्यात शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. गोव्याच्या अद्वितीय पारंपरिक उत्पादनांचे संरक्षण करून आणि मूल्यवर्धन वाढवून, आर्थिक विकास, कृषी-उद्योजकता आणि ग्रामीण समृद्धीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.