राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने हवामानात बदल झाला असून, हवेत गारवा जाणवत आहे. राज्यातील काही भागात रात्री आणि सकाळच्या वेळी धुके पडण्यास सुरुवात झाली आहे. येथील हवामान विभागाने राज्यात 14 ते 16 सप्टेंबर दरम्यान पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात चोवीस तासांत कुठेही पावसाची नोंद झालेली नाही. राज्यात मान्सून कमकुवत झाला आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यात चोवीस तासांत कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24.6 अंश सेल्सियस नोंद झाले. राज्यात आत्तापर्यंत 116 इंच पावसाची नोंद झाली आहे.