Home बातम्या 5 लाखांच्या चोरी प्रकरणी दोघांना अटक

5 लाखांच्या चोरी प्रकरणी दोघांना अटक

0

येथील एका हॉटेलमध्ये सुमारे 5 लाख 70 हजार रुपयांच्या चोरी प्रकरणात पणजी पोलिसांनी काल दोघांना अटक केली. ही चोरीची घटना 9 सप्टेंबर रोजी दुपारी घडली होती. पणजी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयित आरोपी थुमु रवितेजा रामनाथ (रा. हैदराबाद) आणि अशरफ शेख अब्दुल कलाम (रा. तेलंगणा) या दोघांना अटक अटक करण्यात काल यश मिळविले. यासंबंधी मदुगुला कार्तिक (हैदराबाद, तेलंगणा) याने पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. संशयित आरोपींनी तक्रारदार मदुगुला कार्तिक यांच्याशी मैत्री करून 9 सप्टेंबरला त्यांच्यासोबत हॉटेलमध्ये एकाच खोलीत वास्तव्य केले होते. यानंतर तक्रारदाराच्या बॅगमधील 5 लाख 70 रुपयांची चोरी करून दोघांनी पलायन केले होते.