९९० रुपये किमतीला २-डीजी औषध उपलब्ध

0
44

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने धुमाकूळ घातल्यानंतर आता तिसर्‍या लाटेचे संकट येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी या औषध कंपनीने २-डीऑक्सी-डी-ग्लुकोज अर्थात २-डीजी या कोविडवरच्या औषधाच्या व्यावसायिक उपलब्धतेची घोषणा काल केली. हे औषध ९९० रुपयांना मिळणार आहे. मात्र केंद्र व राज्य सरकारांना सवलतीच्या दरात हे औषध उपलब्ध होणार आहे.

डीआरडीओ आणि इन्मास या संस्थांच्या सहयोगाने डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीने हे औषध विकसित केले आहे. हे औषध हॉस्पिटलमध्ये दाखल कोविड रुग्णांना दिल्यास त्यांच्या आजाराची गंभीरता लवकर कमी होण्यास आणि कृत्रिम ऑक्सिजनवरचे अवलंबित्व कमी करण्यास मदत होते. व्यावसायिक वापरासाठी हे औषध उपलब्ध केल्याने कोणालाही विकत घेता येणार आहे.