७१३ रुग्णांचा नवा उच्चांक, ८ मृत्यू

0
301

>> तीन दिवसांत नवे १,९३७ पॉझिटिव्ह, जनता हवालदिल

राज्यात सप्टेंबर महिन्यात सलग तीन दिवसापांसून कोरोना पॉझिटिव्हचे रुग्ण उच्चांकी आकड्यात आढळून येत असून काल गुरूवारी ७१३ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तसेच ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोना बळींची संख्या २१२ झाली आहे. तीन दिवसांत १ हजार ९३७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जनता हवालदिल झाली आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १९,३५५ एवढी झाली आहे. कोरोना सध्याच्या रुग्णांची संख्या ४७८२ झाली आहे.

बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या २२९१ स्वॅबच्या नमुन्यांपैकी एक तृतीयांश स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आरोग्य खात्याने २३२२ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.

आणखी आठ जणांचा बळी
काल आणखी ८ कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे. नावेली येथील ३८ वर्षांच्या युवकाचे बांबोळी येथील जीएमसीमध्ये बुधवारी निधन झाले. कुडका बांबोळी येथील ४७ वर्षांचा पुरुष रुग्ण, म्हापसा येथील ७९ वर्षांच्या महिला रुग्णाचे बांबोळी येथील गोमेकॉमध्ये बुधवारी निधन झाले. मडगाव येथील ७० वर्षांचा पुरुष रुग्ण, नावेली येथील ७५ वर्षांच्या पुरुष रुग्णाचे बांबोळी येथील गोमेकॉमध्ये काल निधन झाले. साखळी येथील ८० वर्षांचा पुरुष रुग्ण, घोगळ मडगाव येथील ७२ वर्षाच्या पुरुष रुग्णाचे मडगाव कोविड इस्पितळात बुधवारी निधन झाले. जुवारीनगरे येथील ६५ वर्षांच्या पुरुष रुग्णाचे काल निधन झाले.

३०२ रुग्ण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह आणखीन ३०२ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १४,३६१ एवढी झाली आहे.

पणजीत नवे ४२ रुग्ण
पणजी उच्च आरोग्य केंद्राच्या कक्षेत कोरोना पॉझिटिव्ह नवे ४२ रुग्ण आढळल असून एकूण संख्या २२४ झाली आहे. सांतइनेज, मळा, भाटले, रायबंदर, कोर्तिम, करंजाळे, टोक, आल्तिनो, दोनापावल आदी भागात रुग्ण आढळले आहेत.

म्हापशात एकाच दिवशी ३ बळी
म्हापसा शहरात काल गुरूवारी एकाच दिवशी कोरोनामुळे तिघांचे बळी गेले तर २५ कोरोनाबाधित सापडले. काल बळी गेलेल्यांमध्ये कुचेलीतील १ तर फेअरआल्तमधील २ रुग्णांचा समावेश आहे. म्हापसा शहरात आत्तापर्यंत एकूण १२ बळी गेले असून २२० बाधित आहेत.