२४ तासांत आणखी २४७ बाधित; २ मृत्यू

0
74

राज्यात नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच असून मागील चोवीस तासांत नवे २४७ बाधित नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच, काल आणखी दोन रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यातील सध्याच्या रुग्णांची संख्या २१८० एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ८३७ झाली आहे. पणजी, पर्वरी, मडगाव, म्हापसा, कांदोळी, वास्को, कुठ्ठाळी, फोंडा या भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

एप्रिल महिन्यापासून दर दिवशी दोनशेपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असून कोरोना बळींची नोंद होत आहे. चोवीस तासात आणखी २ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५९ हजार ३१५ एवढी झाली आहे. कोरोनाबाधित आणखी १४२ रुग्ण बरे झाले आहेत. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या ५६ हजार २९८ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९१ टक्के एवढे आहे.

कोरोना पॉझिटिव्ह नवीन १३८ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन ३२ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. चोवीस तासांत २०४६ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील १२.०७ टक्के नमुने बाधित आढळून आले आहेत. मडगावातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या २३६ झाली आहे. पणजीत २१२ रुग्ण, कांदोळीत १८८ रुग्ण, पर्वरीत १७७ रुग्ण, फोंड्यात १६७ रुग्ण, कुठ्ठाळीत १२४ रुग्ण, वास्कोत १२२ रुग्ण आणि म्हापशात १०६ रुग्ण आहेत.