देशात कोरोनाचे १ लाखावर नवे रुग्ण

0
161

भारतात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे नवे १ लाख ३ हजार ५५८ रुग्ण आढळून आले असून देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या एक कोटी पंचवीस लाख ८९ हजार ६७ झाली आहे. यापूर्वी एका दिवसात तब्बल ९७,८९४ नवे कोरोना रुग्ण सापडल्याची नोंद गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला झाली होती. त्यानंतरची ही सर्वांत मोठी संख्या आहे. गेले २६ दिवस सतत कोरोना रुग्णांत वाढ होत असून सध्या देशात सात लाख ४१ हजार ८३० कोरोना रुग्ण आहेत. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण सध्या ९२.८० टक्क्यांवर घसरले आहे. भारतातील कोरोना रुग्णसंख्येने गेल्या वर्षी १९ डिसेंबरला १ कोटीचा पल्ला गाठला होता.