१८ लाख विद्यार्थ्यांनी दिली ‘नीट’ची परीक्षा

0
8

देशभरात नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच नीटची परीक्षा काल रविवारी झाली. या परीक्षेसाठी देशभरातून तब्बल १८ लाख विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. कोरोनाच्या नियमावलींचे पालन करुन ही परीक्षा घेण्यात आली होती. काल दुपारी २ ते ५.२० या दरम्यान ही परीक्षा झाली.

यूजी नीट (छएएढ-णॠ २०२२) परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. या परीक्षेचे आयोजन १३ भाषांमध्ये केले होते. यामध्ये इंग्रजी, हिंदी आणि उर्दूसह भारतात वापरल्या जाणार्‍या आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, मल्याळम, ओडिसा, पंजाबी, तामिळ आणि तेलगू भाषेतदेखील परीक्षा घेण्यात आली. देशभरातील ५४६ शहरांमध्ये आणि देशाबाहेरील १४ शहरांत ही परीक्षा झाली.

१० लाखांहून अधिक विद्यार्थिनी
काल झालेल्या नीट परीक्षेसाठी १० लाखाहून जास्त विद्यार्थिनी या परीक्षेसाठी बसल्या होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या २.५७ लाखांनी जास्त आहे.