१८ ते ४४ वयोगटासाठी कोविशिल्डचा साठा प्राप्त

0
54

केंद्र सरकारकडून राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी कोविशिल्डच्या ३२ हजार ८७० डोसाचा प्रथम साठा काल प्राप्त झाला आहे.

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी राज्य सरकारकडून कार्यक्रम तयार केल्यानंतर लसीकरणाला प्रारंभ केला जाणार आहे. या वयोगटासाठी लशीचा साठा उपलब्ध न झाल्याने लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला नव्हता.

आतापर्यंत ४ लाख ६६९
जणांचे एकूण लसीकरण

राज्यात बुधवारी ३९५१ जणांना लशीचा प्रथम डोस आणि १८९३ जणांना दुसरा डोस देण्यात आला. दिवसभरात ५ हजार ८४४ जणांना लशीचा डोस देण्यात आला. राज्यात आत्तापर्यंत एकूण ४ लाख ६६९ कोरोना प्रतिबंधक लशीचे डोस देण्यात आले आहेत.

राज्यातील २ लाख २१ हजार ७७५ जणांना प्रथम डोस देण्यात आला आहे. तर, ८९ हजार ४४७ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.