कोरोनाची गंभीर दखल घेत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा ः सुदिन

0
69

राज्यातील कोरोना महामारी नियंत्रणास भाजप सरकार अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री, मंत्री यांच्याकडून परस्पर विधाने करून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. भाजपमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. राज्यपालांनी कोरोना महामारी वाढीची गंभीर दखल घेऊन सरकार तात्काळ बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी काल केली.

कोरोना महामारीवर नियंत्रण नसल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. इस्पितळात प्राणवायूची कमतरता भासत आहे. प्राणवायूच्या अभावामुळे अनेकांचे बळी जात आहेत. राज्यातील प्राणवायूचे उत्पादन वाढ करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा, केंद्र सरकारकडून अतिरिक्त प्राणवायू मिळविण्याची गरज आहे. कोरोना योग्य नियोजनासाठी पुन्हा आयएएस अधिकारी नीला मोहनन यांना गोव्यात पाचारण करावे, अशी मागणी आमदार ढवळीकर यांनी केली.

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना
पदांवरून हटवा ः कॉंग्रेस

राज्यातील कोरोना व्यवस्थापनात अपयशी ठरलेले, कोरोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यूस जबाबदार असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांना पदावरून हटविण्याची मागणी अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी काल केली.
मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री दोघेही परस्पर विरोधी विधाने करीत आहेत. दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा ताळमेळ नाही. कुणाचे म्हणणे खरे? गोव्यातील कोरोना बळींच्या वाढत्या संख्येला कुणाला जबाबदार धरावे हेच कळत नसून त्यांनी लोकांच्या भावनांशी खेळ मांडला आहे, अशी टीका श्री. राव यांनी केली.