१०८ वर्षीय महिलेने घेतली लस

0
153

हिराबाई नागेश परब ह्या तब्बल १०८ वर्षीय महिलेने काल डिचोली येथील सामाजिक आरोग्य केंद्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कोविडसाठीच्या लशीचा पहिला डोस घेतला. कोविडसाठीची लस घेणारी ती राज्यातील सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती ठरली आहे.

शिवाय ती ही लस घेणारी कदाचित देशातीलही सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती असावी अशी शक्यता भाजपच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी व्यक्त केली आहे. मुळगाव येथील धाकटी वनदेवी सभागृह येथे हा लसीकरणाचा कार्यक्रम डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राने आयोजित केला होता. त्यावेळी २२३ जणांनी लस टोचून घेतली.

यावेळी सभापती राजेश पाटणेकर, वैद्यकीय अधिकारी मेधा साळकर, शिल्पा नाईक, श्रुती घाटवळ आदी हजर होते.