बुधवारी कोरोनाने चौघांचा मृत्यू

0
138

>> नवीन ४७३ बाधित, एकूण ८५७ बळी

राज्यात चोवीस तासांत चार कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून नवे ४७३ बाधित रुग्ण सापडले आहेत. राज्यातील सध्याच्या रुग्णांची संख्या ५११२ एवढी झाली आहे. तर, कोरोना बळीची एकूण संख्या ८५७ झाली आहे. राज्यातील बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण २१.१५ टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सततची वाढ कायम आहे. इस्पितळात दाखल होणार्‍या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. काल नवीन ७८ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले. तर, मंगळवारी नवीन ९७ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत.

मडगावात सर्वाधिक ५९१ रुग्ण
मडगावातील सध्याच्या रुग्णांची संख्या सहाशेच्या जवळ आली असून रूग्णसंख्या ५९१ एवढी झाली आहे. पर्वरी परिसरातील रुग्णसंख्या ४८४ झाली आहे. फोंड्यातील रुग्णसंख्या ३८७ कांदोळी येथील रूग्णसंख्या ३४४ एवढी आहे. म्हापसा येथील रूग्णसंख्या ३४१ आणि पणजीतील रुग्णसंख्या ३२२ एवढी झाली आहे. वास्को, कुठ्ठाळी, शिवोली, खोर्ली, चिंबल, साखळी, डिचोली, पेडणे आदी भागात रूग्णसंख्या वाढत आहे. वास्कोत २३९, कुठ्ठाळी येथे २६५, शिवोलीत १६२, कासावली येथे १५१ रुग्ण, खोर्ली ११८, चिंबल १८० आणि साखळीत ११५ रुग्ण, डिचोली ११०, पेडणे ११४ रूग्ण आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ६३ हजार ८१५ एवढी झाली आहे. कोरोनाबाधित आणखी २४५ रुग्ण बरे झाले आहेत. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या ५७ हजार ८४६ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.६४ टक्के एवढे आहे.
कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन ४०१ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. चोवीस तासांत २२३६ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील २१.१५ टक्के नमुने बाधित आढळून आले आहेत. तर २५ प्रवासी बाधित आढळून आले आहेत.