Home बातम्या १०८ कर्मचार्‍यांना कॉंग्रेसचा पाठिंबा

१०८ कर्मचार्‍यांना कॉंग्रेसचा पाठिंबा

0

प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझीन फालेरो यांनी काल आझाद मैदानावर धरणे धरलेल्या १०८ रुग्णवाहिका कामगारांची भेट घेऊन आपला पाठिंबा व्यक्त केला. भाजप सरकार भूमीपुत्रांवरच अन्याय करीत असल्याचा आरोप फालेरो यांनी यावेळी बोलताना केला. गेले काही दिवस वरील कामगार धरणे धरून बसले आहेत. सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा या कामगारांचा आरोप आहे.