आरोग्य खात्याने आत्तापर्यंत ६० रक्ताचे नमुने दिल्लीला तपासणीसाठी पाठवले होते. त्यांपैकी ४७ नमुन्यांचा अहवाल आला असून आठ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती आरोग्य मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी दिली. वरील रोगाची लागण झालेल्यांना अन्य रुग्णांपासून अलिप्त ठेवण्याची व्यवस्था केली असल्याचेही त्यांनी सांगितले. या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी जाहिरात तसेच अन्य माध्यमाद्वारे जनतेत जागृती केली जात आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.