१०८च्या २० जणांना सेवेतून काढले

0
69

>> कामचुकारपणाबद्दल कारवाई

आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या सूचनेवरून काल १०८ रुग्णवाहिकांच्या व्यवस्थापनाने २० चालक व कर्मचार्‍यांना सेवेतून काढून टाकले. श्री. राणे यांनी काल आकस्मिक भेट देऊन १०८ रुग्णवाहिकांची पहाणी केली असता हे कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याचे त्यांना आढळून आले. तसेच रुग्णवाहिका अस्वच्छ ठेवल्याचे त्यांना दिसून आले.
आणिबाणीच्या प्रसंगी रुग्णवाहिका घेऊन जाण्यास हे कर्मचारी नकार देत असतात अशा तक्रारी होत्या. त्यात तथ्य असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना कामावरून काढून टाकल्याचे आदेश आपण दिल्याचे श्री. राणे यांनी सांगितले. त्या जागी नवीन कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अपघातात जखमी झालेले लोक व गंभीर अवस्थेत असलेले रुग्ण यांच्यासाठी ही सेवा सुरू केलेली असून आपण कोणालाही त्यांच्या जीवाशी खेळू देणार नसल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.