नव्या भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी राज्यांचे सहकार्य महत्वपूर्ण

0
89

>> नीति आयोगाच्या बैठकीत पंतप्रधानांचे मत

नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी आपल्या सरकारला सर्व राज्य सरकारांनी सहकार्याचा हात द्यावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल येथे केले. राष्ट्रपती भवनात नीति आयोगाच्या कार्यकारी समिती बैठकीत मोदी बोलत होते. या बैठकीवेळी देशाच्या वेगवान विकासासाठी रोड मॅप सादर करण्यात आला.

या बैठकीस विविध राज्यांचे मुख्यमंत्री, प्रशासकीय अधिकारी, नीति आयोगाचे सदस्य आदी उपस्थित होते प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या बैठकीस उपस्थित नव्हते. मात्र दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यावेळी उपस्थित होते.
विविध राज्यांची सरकारे व मुख्यमंत्री यांनी विकासासाठी प्रयत्न केले तर नव्या भारताच्या निर्मितीचे स्वप्न साकार होईल असे मोदी यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या योगदानाचे महत्व या संदर्भात लक्षणीय असल्याचे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की स्वच्छ भारत, कौशल्य विकास, डिजिटल पेमेंट अशा योजनांची धोरणे निश्‍चित करता मुख्यमंत्र्यांची मते अजमावली जातील.