Home Featured होळी अंगावर पडून जखमी झालेल्यापोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू

होळी अंगावर पडून जखमी झालेल्यापोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू

0

मेणकुरे येथे होळी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत जखमी झालेल्या मेणकुरे येथील प्रणव पांडुरंग मिशाळ (42) या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. गावातून होळी नेत असताना ती अचानक त्यांच्या अंगावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

सोमवारी सायंकाळी गावातील मंडळी होळी घेऊन जात असताना ही दुर्घटना घडली होती. प्रणव मिशाळ यांच्या अंगावर होळी कोसळल्याने ते त्याखाली चिरडले गेले. त्यांना तातडीने म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) येथे हलविण्यात आले. मात्र, मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शिगोत्सवाची धूम सर्वत्र सुरू असताना घडलेल्या या घटनेमुळे मेणकुरे गावासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. स्थानिक आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
प्रणव मिशाळ हे पोलीस खात्यात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दहावीत शिकणारा मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.