हायब्रिड फेरीबोटींची संख्या वाढवणार : मुख्यमंत्री

0
6

जीवाश्म इंधनावर चालणार्‍या फेरीबोटींची संख्या कमी करता यावी, यासाठी राज्य सरकार सौरऊर्जा आणि विजेवर चालणार्‍या हायब्रिड फेरीबोटींची संख्या वाढवणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी काल सांगितले.

गुरुवारी पणजी-चोडण जलमार्गावर नव्याकोर्‍या सौरऊर्जा व विजेवर चालणार्‍या हायब्रिड फेरीबोटीचे लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी केंद्रीय बंदर, जहाजोद्योग व जलमार्गमंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि नदी परिवहन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई हे हजर होते. यावेळी पणजीत तरंगत्या जेटीचाही शुभारंभ करण्यात आला. नवी हायब्रीड फेरीबोट ही सौरऊर्जा, वीज आणि डिझेलवरही चालू शकते. ६० प्रवाशांना वाहून नेण्याची या फेरीबोटीची क्षमता असून, ती फक्त प्रवाशांसाठीच आहे. या बोटीतून कोणत्याही प्रकारची वाहने नेता येणार नाहीत. ही फेरीबोट बांधण्यासाठी ३ कोटी ९७ लाख रुपये एवढा खर्च आला आहे.