हाथरसप्रकरणी हिंसा करण्याचा कट उघड, चौघांना अटक

0
261

हाथरस घटनेनंतर जातीय हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून मथुरा येथील टोल नाक्याजवळ ४ जणांना अटक करण्यात आली. हे चौघेही दिल्लीहून हाथरसच्या दिशेने जात होते. यापैकी एक जामियाचा विद्यार्थीही आहे. युपीमध्ये दंगलीचा कट रचणारा पीएफआयचा मास्टरमाइंड असल्याचा पोलिसांनी आरोप केला आहे.

अटक केलेल्या विद्यार्थ्याचे नाव मसूद अहमद असे आहे. बहराइच जिल्ह्यातील जरवाल रोड इथला तो राहणारा आहे. मसूद अहमद हा दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामियामध्ये एलएलबीचा विद्यार्थी आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो कॅम्पस फ्रेंड्स ऑफ इंडियाशी संबंधित असून ही संस्था पॉप्युलर फ्रेंड ऑफ इंडियाची विद्यार्थी संघटना आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

यापूर्वी हाथरस सामूहिक बलात्काराच्या संदर्भात उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी पोस्टर्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटले होते. वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही प्रशांत कुमार यांनी सांगितले होते. हाथरस सामूहिक बलात्कारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाली. यावेळी उत्तर प्रदेश सरकारने कोर्टासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले. यावेळी मृतदेहावर मध्यरात्री अंत्यसंस्कार का केले या गोष्टीवर खुलासा केला.
युपी सरकारने न्यायालयात या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे समर्थन करताना सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या

युपी सरकारचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र
सकाळी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होण्याची शक्यता असल्यामुळे पीडितेवर रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे उत्तर फ्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या अंत्यसंस्काराबाबत पीडितेच्या आई-वजडिलांना माहिती देण्यात आली होती. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार या प्रकरणाला जातीय
आणि धार्मिक रंग दिला जाऊ शकतो, अशी शक्यता
वर्तवण्यात आली होती असेही सरकारने म्हटले आहे.