ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी औदुंबर शिंक्रे यांचे निधन

0
280

गोवामुक्ती चळवळीतील अग्रणी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी औदुंबर शिंक्रे (८६) यांचे काल मंगळवारी मडगाव येथील एका खासगी इस्पितळात उपचारादरम्यान रात्री उशिरा निधन झाले. स्वातंत्र्यसेनानी औदुंबर शिंक्रे हे वार्धक्यामुळे काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर मडगावातील इस्पितळात उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले- बिपीन, बिधान, व बिरेन, दोन सुना व नातवंडे असा परिवार आहे.

औदुंबर शिंक्रे यांची अंत्ययात्रा आज बुधवारी सकाळी अकरा वाजता पंडितवाडा-फोंडा येथील त्यांच्या निवासस्थानाहून निघणार असून, त्यानंतर फोंड्यातील मुक्तिधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. स्वातंत्र्यसेनानी औदुंबर शिंक्रे यांचा मराठी लढ्यातही सहभाग होता. शिंक्रे यांचा गोव्याच्या स्वातंत्र्यसंग्रामाशी त्यांचा संबंध होता. विविध सामाजिक संघटनांशी त्यांचा संबंध होता. स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे ते सचिव होते.