स्टेट बँकेच्या गृहकर्जावरील व्याजदरात वाढ इतर बँकाही दरवाढ करण्याची चिन्हे

0
75

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने गृहकर्जावरील किमान व्याजदरात २५ मूलांकांची वाढ केल्याने व्याज दर ६.७० वरून ६.९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. १ एप्रिलपासून हा दर लागू झाला आहे. स्टेट बँकेपाठोपाठ इतर बँकाही व्याजदरात वाढ करण्याची चिन्हे दिसत आहेत. १ मार्च २०२१ रोजी स्टेट बँकेने गृहकर्जाच्या दरात ६.८० टक्क्यांवरून ६.७० टक्के कपात केली होती. मात्र, ती सवलत मर्यादित काळापुरती होती. मात्र, आता स्टेट बँकेने केवळ कर्जावरील व्याजदरातच वाढ केली आहे असे नव्हे, तर प्रक्रिया शुल्कही लागू केले आहे. कर्जाच्या ०.४० टक्के अधिक जीएसटी मिळून किमान १० हजार व कमाल ३० हजार रुपयांच्या दरम्यान प्रक्रिया शुल्क आकारले जाणार आहे.