सेंटनरला डच्चू; ऐजाझला संधी

0
113

>> भारताविरुद्धच्या कसोटींसाठी न्यूझीलंड संघ जाहीर

भारताविरुद्धच्या दोन कसोटी सा’न्यांच्या ’ालिकेसाठी न्यूझीलंडने काल सो’वारी आपल्या संघाची घोषणा केली. ऐजाझ पटेलच्या रुपात त्यांनी एक’ेव स्पेशलिस्ट फिरकीपटूची निवड केली आहे. टीम इंडियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत केलेल्या प्रदर्शनाच्या जोरावर काईल जेमिसन याने संघात स्थान मिळविले आहे. जिमी नीशमची जागा अष्टपैलू डॅरेल मिचेल याने घेतली आहे. ऐजाझच्या समावेशामुळे मिचेल सेंटनर याला बाहेर बसावे लागले आहे. सेंटनरसह जीत रावल व मॅट हेन्री यांनादेखील संघात स्थान मिळालेले नाही. ट्रेंट बोल्ट संघात परतल्यामुळे न्यूझीलंडच्या जलदगती विभागाला बळकटी मिळाली आहे. बोल्ट, साऊथी व वॅगनर हे त्रिकुट पहिल्या लढतीत खेळणे अपेक्षित असून ‘ऑल पेस अटॅक’ खेळविण्याचा निर्णय झाला तरच जेमिसन अंतिम ‘११’मध्ये दिसू शकतो. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २१ फेब्रुवारीपासून वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह येथे व दुसरा सामना ख्राईस्टचर्च येेथे २९ फेब्रुवारीपासून होणार आहे.
-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-
न्यूझीलंड संघ ः केन विल्यमसन (कर्णधार), टॉम लेथम, टॉम ब्लंडेल, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बीजे वॉटलिंग, कॉलिन डी ग्रँडहोम, टीम साऊथी, नील वॅगनर, ट्रेंट बोल्ट, ऐजाझ पटेल, काईल जेमिसन व डॅरेल मिचेल.