‘सूदिरसूक्त’प्रकरणी भाजपचा विष्णू वाघांना पाठिंबा

0
76

राज्यात विष्णू वाघयांचा सूदिरसूक्त हा कवितासंग्रह चर्चेचा विषय बनला आहे. फोंडा पोलिसांनी कवी विष्णू वाघ आणि अपूरबायच्या प्रकाशिका हेमा नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर वाद आणखीन वाढला आहे. या विषयावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर भाजपने कवी विष्णू वाघ यांना काल पाठिंबा जाहीर केला.

माजी उपसभापती, साहित्यिक विष्णू वाघ यांच्या सूदिरसूक्त या कवितासंग्रहातील कवितेत आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. बहुजन समाजाला समजणार्‍या भाषेचा वापर कवितेत करण्यात आला आहे, असा दावा भाजपचे उपाध्यक्ष तथा भंडारी समाजाचे अध्यक्ष अनिल होबळे यांनी पत्रकार परिषदेत केला.
श्री. वाघ यांच्या सूदिरसूक्त कवितासंग्रहाचे प्रकाशन २०१३ मध्ये करण्यात आले. या कवितासंग्रहाविरोधात तक्रार दाखल करणा-या आवडा व्हीएगश एवढी वर्षे कुठे होत्या असा प्रश्‍न होबळे यांनी उपस्थित केला.
श्री. वाघ यांच्या या कवितासंग्रहाची पुरस्कारासाठी शिफारस केल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे. वाघ यांची प्रकृती ठीक नसल्याने ते आपल्या भूमिकेचे समर्थन करू शकत नाहीत. अन्यथा वाघ यांनी विरोधकांना चोख उत्तर दिले असते, असेही होबळे यांनी सांगितले.

सूदिरसूक्त या कवितासंग्रहातील एका कवितेवरून वाघ यांच्या बदनामीचे षडेेयंत्र रचण्यात आले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासमोर हा विषय मांडला आहे. या तक्रारीचा प्राथमिक तपास करून त्यात तथ्थ नसल्यास प्रकरण बंद करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दिले आहे, असेही होबळे यांनी सांगितले.