पंतप्रधान मोदींची दरमहा सरासरी १९ जाहीर भाषणे

0
94

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून ताबा स्वीकारल्यापासून आजवर तब्बल ७७५ जाहीर भाषणे केल्याचे वृत्त ‘इकॉनॉमिक टाइम्स’ या दैनिकाने दिले आहे. हे प्रमाण दरमहा सरासरी १९ असून दर तीन दिवसांना दोन जाहीर भाषणे केल्याचे यावरून दिसून येते. विशेष म्हणजे यापैकी बहुतेक भाषणे ही अर्ध्या तासाहून अधिक वेळची आहेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मात्र संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दोन्ही कार्यकाळांत म्हणजे १० वर्षांत १४०१ जाहीर भाषणे केली. हे प्रमाण सरासरी दरमहा ११ भाषणे असे आहे.
मोदींच्या विदेश दौर्‍यांमध्ये त्यांना सातत्याने जाहीर भाषणे करावी लागल्याने ही सरासरी वाढलेली दिसते.