ओपा प्रकल्पाला गळती; तिसवाडीत पाणी टंचाई

0
83

तिसवाडीला पाण्याचा पुरवठा करणार्‍या ओपा प्रकल्पातील मुख्य जलवाहिनीतून काल पहाटे ५ च्या सुमारास पाण्याची गळतीमुळे प्रकल्पातील पाणी शुद्धीकरण प्रक्रिया ठप्प झाल्याने तिसवाडी तालुक्यातील विविध भागातील नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागले.

ओपा पाणी प्रकल्पातील मुख्य जलवाहिनीला जोडावर गळती सुरू झाल्याचे आढळून आल्यानंतर नदीतून पाणी खेचण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली. सकाळी १०.३० वाजता जलवाहिनीची दुरूस्ती केल्यानंतर पुन्हा पाणी शुद्धीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्ता दिलीप ढवळीकर यांनी दिली.
या प्रकारामुळे मंगळवारी पणजी परिसरात मर्यादित पाण्याचा पुरवठा करण्यात आला. पणजी शहरासह ताळगाव, टोक, सांताक्रुज, रायबंदर, मेरशी व इतर भागात मर्यादित पाणीपुरवठ्यामुळे अनेकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागले. बुधवारी संध्याकाळपर्यत तिसवाडीतील पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.