सुरक्षा रक्षकाचा कुंकळ्ळीत खून

0
225

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यातील सुरक्षा रक्षकाचा डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

या कारखान्यात बोटी बनवण्याचे काम केले जाते. या कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेल्या सिद्ध रामेय्या (६०) हा काल मंगळवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आला. सिद्ध रामेय्या हा मूळ बिहार येथील आहे. रामेय्या याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने प्रहार केल्याचे पोलिसांनी सांगितले. कुंकळ्ळी पोलिसांनी याची खबर मिळताच मृतदेह हॉस्पिसियो इस्पितळात शवचिकित्सेसाठी नेला असून आज अहवाल प्राप्त होणार आहे. या प्रकरणी कुंकळ्ळी पोलीस अधिक तपास करत आहेत.