सुरक्षा रक्षकांचे आंदोलन १४ पासून तीव्र : अजितसिंह

0
95

विविध सरकारी खाती व महामंडळे यात सुरक्षा रक्षक म्हणून काम केलेल्या व सध्या कामावरून कमी केल्याने बेरोजगार बनलेल्या सुरक्षा रक्षकाचे नेते अजितसिंह राणे यांनी या सुरक्षा रक्षकांचे आंदोलन येत्या १४ रोजीपासून तीव्र करण्याचा निर्णय घेतला असल्याचे काल सांगितले. या दिवशी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत पणजीतून मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री खोटी आश्‍वासने देत असून या सुरक्षा रक्षकाना कामावर घेत नसल्याचा आरोप राणे यांनी यावेळी केला.