पेडणे येथे अपघातात एक ठार

0
98

न्हयबाग-पेडणे येथे राष्ट्रीय मुख्य रस्त्यावर मंगळवारी रात्री ट्रॉली उलटून चालक रामू बसमीत हा जागीच ठार झाला. अपघात इतका जबरदस्त होता की ट्रॉलीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. मंगळवारी रात्री गोव्याहून मुंबईकडे जाणारी (एमएच४६ एएफ ०७०६) ही ट्रॉली न्हयबाग पुलाजवळील वळणार उलटली, त्यात ड्रायव्हर जागीच ठार होण्याची घटना घडली. पेडणेचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.