पाकिस्तान १७३ भारतीय कैद्यांची सुटका करणार

0
98

पाकिस्तान सरकार तेथील तुरुंगात असलेल्या ५२६ भारतीय कैद्यांपैकी १७३ जणांची येत्या १६ रोजी सुटका करणार असल्याची माहिती विदेश व्यवहार खात्याने दिली. या संदर्भात लेखी कागदपत्र भारत सरकारला मिळाल्याची माहिती विदेश व्यवहार खात्याचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दिन यांनी दिली.