सुमूलकडे गेलेले अनेक दूध उत्पादक पुन्हा गोवा डेअरीकडे

0
65

>> सुमूलला घातलेल्या नियमांची तपासणी व्हावी ः माधव सहकारी

 

गोवा डेअरीशी स्पर्धा करण्यासाठी सरकारने सुमुलला गोव्यात दूध संकलनासाठी परवानगी दिली होती. परंतु अवघ्या काही महिन्यांतच दूध उत्पादक सुमुल सोडून गोवा डेअरीकडे वळू लागले असून सरकारने सुमुलला घातलेल्या
नियमांची तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे गोवा डेअरीचे चेअरमन माधव सहकारी यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
सुमुलला परवानगी दिल्यानंतर गोवा डेअरी सोडून अनेक दूध उत्पादक सुमुलकडे वळाले होते. १२५ पैकी ६० दूध उत्पादक संस्था पुन्हा गोवा डेअरीकडे वळले असले तरी काही दूध उत्पादक त्या उत्पादकांना पुन्हा घेण्यास नकार देत आहेत. गोवा डेअरीतर्ङ्गे खास अधिकारी नियुक्त करून अशा प्रकारची प्रकरणे मिटविण्यात येत आहेत. सुमुलला अनेक अटी सरकारने घातल्या होत्या. त्या अटींचे पालन सुमुल करीत आहे की नाही याची तपासणी सरकारने केली पाहिजे असे त्यांनी सांगितले. प्रत्येक सरकारने गोवा डेअरीला वेळोवेळी सहकार्य केले असले तरी कधीच प्रत्यक्ष हस्तक्षेप केला नाही. तसेच दूध वाढ करताना कधीच सरकारची परवानगी घेण्यात आली नाही. शेतकर्‍यांच्या मागणीनुसार सप्टेंबर महिन्यापासून दूध दरात वाढ केली असली तरी त्याचा ङ्गटका गोवा डेअरीला बसला नसल्याचे माधव सहकारी यांनी सांगितले.