भाभासुमंला पाठिंब्याचा शिवसेनेचा निर्णय

0
86

>> भाजपाच्या पराभवाचाच हेतू : ताम्हणकर

 

वडणुकीत भारतीय भाषा सुरक्षा मंचला पाठिंबा देण्याचा निर्णय प्रदेश शिवसेनेने घेतल्याची माहिती राज्यप्रमुख सुदीप ताम्हणकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. कोणत्याही परिस्थितीत भाजपचा पराभव करणे हा हेतू आहे. भाभासुमंने म.गो.लाही ३० सप्टेंबरपर्यंत भाजपची साथ सोडण्यासाठी मुदत दिली आहे. मगोने स्वतंत्रपणे निवडणूक लढविल्यास शिवसेनेचा मगोला पाठिंबा असेल, असे ते म्हणाले.
इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांचे अनुदान रद्द करण्याची मागणी लावून धरणार्‍या पक्षाबरोबर शिवसेना असेल. सध्या निवडणुकीच्या तयारीसाठी संघटना बळकट करण्याचे काम चालू आहे. ऑक्टोबर दरम्यान शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे गोव्यात येऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, असे ताम्हणकर यांनी सांगितले. निवडणुकीत भाभासुमंला पाठिंबा देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांकडून वाहन चालकांना
बेकायदा दंड
सध्या पोलीस बेकायदेशीरपणे वाहनांना चलने देऊन दंड वसूल करीत आहेत. येत्या आठ दिवसात हा प्रकार बंद न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ताम्हणकर यांनी दिला आहे. चलन देवून दंड वसूल करण्याचा पोलिसांना अधिकार देणार्‍या अधिसूचनेची मुदत संपली असतानाही पोलीस दंड कसे वसूल करतात, असा प्रश्‍न ताम्हणकर यांनी केला. पोलिसांना चलन देण्याचाच अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.