सीझेडएमपीवर उद्या सुनावणी

0
69

राज्यात येत्या रविवार ७ मार्चला पणजी आणि मडगाव येथे किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यावर (सीझेडएमपी) जनसुनावणी घेतली जाणार आहे. पणजी येथील जनसुनावणी कला अकादमीच्या आवारात घेतली जाणार आहे. तर, मडगाव येथील जनसुनावणी रवींद्र भवनाच्या आवारात घेतली जाणार आहे.
राज्य सरकारने तयार करून घेतलेल्या सीझेडएमपीबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. ग्रामसभांतून सीझेडएमपीवर चर्चा करून सीझेडएमपीबाबत नापसंती व्यक्त केली जात आहे. या आराखड्यावर जिल्हा पातळीवरील जनसुनावणीला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. सीझेडएमपीबाबत जास्तीत जास्त नागरिकांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळावी म्हणून तालुका पातळीवर जनसुनावणी घेण्याची मागणी केली जात आहे.