शुक्रवारी राज्यात ७९ कोरोना रुग्ण

0
168

राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी १ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून नवीन ७९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ७९९ एवढी झाली आहे. राज्यात सध्याच्या कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. सध्याच्या कोरोना रूग्णांची संख्या पाचशेच्याखाली आली होती. सध्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६७५ एवढी झाली आहे.
कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५५,२९१ एवढी झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आणखी ४२ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण ५३ हजार ८१७ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३३ टक्के एवढे आहे. चोवीस तासांत नवीन १,६०७ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ४.९१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन ३१ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.
मडगाव आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा शंभराच्याजवळ येऊन ठेपली आहे. मडगावातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ९८ झाली आहे. पणजीत उच्च आरोग्य केंद्राच्या कक्षेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली असून सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ७७ इतकी आहे. चिंबल आरोग्य केंद्राच्या कक्षेतील सध्याच्या कोरोना रुग्णांची ५७ झाली आहे. पर्वरीत सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ३४ रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ३३ रुग्ण, म्हापसा ३५ रुग्ण, कांदोळी ३२ रुग्ण, वास्कोत ३९ रुग्ण, काणकोण ३६ रुग्ण, कासावली २९ रुग्ण, कुठ्ठाळीत ३५ रुग्ण आहेत.