सिद्धू मुख्यमंत्री न होण्यासाठी काहीही करीन ः कॅप्टन अमरिंदर

0
36

नवज्योतसिंग सिद्धू मुख्यमंत्री होणार नाहीत यासाठी आपण कुठलाही त्याग करण्यासाठी तयार आहोत. तसेच राहुल आणि प्रियांका गांधी यांना अनुभव नाही. यामुळे त्यांचे सल्लागार त्यांना फसवत असल्याचे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले. पंजाब सरकारमध्ये फेरबदल झाल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी कॉंग्रेसच प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि कॉंग्रेस हायकमांडविरोधात तीव्र राग व्यक्त केला आहे.

पंजाबमध्ये चरणजीतसिंग चन्नी यांच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहात आपला राग त्यांनी दर्शवला होता. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत सिद्धूंचा पराभव करण्यासाठी त्यांच्याविरोधात एक बळकट उमेदवार उभा करेन. निवडणुकीत नवज्योतसिंग सिद्धू मुख्यमंत्रीपदाचे चेहरा ठरले, तर पंजाब कॉंग्रेस अगदी दुहेरी आकडाही गाठू शकणार नाही, असे कॅप्टन म्हणाले.