अरविंद केजरीवाल यांनी घेतले जुने गोवे चर्चचे दर्शन

0
35

आम आदमी पक्षाचे नेते तथा नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी जुने गोवे येथील बासिलिका ऑफ बॉम जिजस चर्चला भेट देऊन दर्शन घेतले. तसेच त्यांनी यावेळी तेथे प्रार्थना केली. यावेळी फादर पॅट्रिलिओ यांनी केजरीवाल यांना चर्चचा इतिहास आणि सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्याविषयीची माहिती दिली. यावेळी केजरीवाल यांनी गोव्याच्या शांती, समृद्धी आणि प्रगतीसाठी प्रार्थना केली. चर्चमधून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केजरीवाल यांनी आपण गोव्याच्या तसेच देशाच्या कल्याणासाठी प्रार्थना केल्याचे सांगितले. आपला देश हा वेगवेगळ्या धर्मांचा पुष्पगुच्छ आहे असे सांगून ही विविधता जपायला हवी, असे ते म्हणाले.