सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

0
139

>> सायना, प्रणॉयचे आव्हान संपुष्टात

खेळाडू पी. व्ही. सिंधूने हॉंगकॉंग बॅडमिंटन सुपर सीरिज स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. परंतु सायना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉय यांचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.
काल झालेल्या अंतिम सोळातील सामन्यात सिंधूने जपानच्या आया ओहोरीचा सिंधूने ३९ मिनिटांत २१-१४, २१-१७ अशा गेम्सनी पराभव केला. २२ वर्षीय हैदराबादी शटलर सिंधूने हा सामना एकतर्फी जिंकला. आता उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा गाठ चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेची विजेती चीनच्या अकाने यामागुचीशी होणार आहे.

दरम्यान, महिला एकेरीत भारताच्या माजी नंबर १ खेळाडू सायना नेहवाला दुसर्‍या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. चीनच्या चेन युफेईने सायना नेहवालचे आव्हान १८-२१, १२-१९, २१-१० असे संपुष्टात आणले.
दरम्यान, पुरुष एकेरीत कजुमासा सकाई या जपानी खेळाडूकडून एस, एस. प्रणॉयला ११ -२१, २१ -१०, २१ -१५ असे पराभूत व्हावे लागल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले.